पुणे महानगरपालिकेच्या मुख्य इमारतीला 2016 मध्ये करण्यात आलेली रोषणाई :
शनिवारवाडा
पहिल्या बाजीराव पेशव्यांनी 1730 साली बांधलेला शनिवारवाडा पुणे शहरातील वारसास्थळ म्हणून घोषित करण्यात आले आहे. शनिवारवाडा येथील ‘लाईट अँड साऊंड शो’ची सुरुवात 2016 मध्ये झाली. हा कार्यक्रम म्हणजे ओपन एअर 7.3 सराऊंड साऊंड सिस्टम वापरुन झालेला पहिला प्रयोग आहे.
<
विश्रामबाग वाडा :
विश्रामबाग वाड्याच्या आतील दृश्य .
दुसर्या बाजीराव पेशव्याचे निवासस्थान म्हणून हा वाडा बांधण्यात आला होता. आता विश्रामबागवाड्यात सुप्रसिद्ध वारसा स्थळांच्या सूक्ष्मरचना जतन करुन ठेवण्यात आल्या आहेत. जनवाणी संस्थेमार्फत या ठिकाणाची सफर आयोजित केली जाते. संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रमात लावणी, भारुड आणि पोवाडे सादर केले जातात.
महात्मा फुले मंडई घड्याळ :
पुणे टुरिस्ट हब प्रोजेक्टचा भाग म्हणून विद्युत विभागाने महात्मा फुले मंडईच्या जुन्या वारसास्थळाच्या रोषणाईचा प्रकल्प राबविला. सुमारे 120 एलईडी दिवे वापरुन दिव्यांचा परिणाम साधला जातो. मुख्य इमारतीच्या कळसावरील दिव्यांचे रंग बदलण्यासाठी डीएमएक्स कंट्रोलर तंत्रज्ञानाचा वापर केला जातो.