जेएलएल मोमेंटम इंडेक्स २०१७
जॉन्स लॅन्ग ऍण्ड लासेल या स्थावर मालमत्ता क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेने अमेरिका, युरोप, आशिया आणि आफ्रिकेतील शहरांचा अभ्यास करून गतीशील शहरांची यादी तयार केली आहे. या अभ्यासामध्ये शहरांच्या सामाजिक-आर्थिक आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रातील विकासाच्या गतीचा अभ्यास करून जगातील एकूण १३४ गतीशील शहरांची यादी तयार करण्यात आली आहे. या १३४ शहरांच्या यादीत पुणे शहराने तेरावे स्थान पटकावले आहे. तर भारतातील सर्वाधिक गतीशील शहरांमध्ये पुणे शहर तिसर्या क्रमांकावर आहे.
या यादीतील जगातील प्रमुख ३० शहरे
1 | बंगळुरू | 11 | दुबई | 21 | सॅन फ्रॅन्सिस्को |
2 | हो ची मिन्ह सिटी | 12 | मेलबॉर्न | 22 | शेंझेन |
3 | सिलिकॉन व्हॅली | 13 | पुणे | 23 | दिल्ली |
4 | शांघाय | 14 | न्युयॉर्क | 24 | रॅली-डरहॅम |
5 | हैदराबाद | 15 | बीजिंग | 25 | मुंबई |
6 | लंडन | 16 | सिडनी | 26 | हंगझोऊ |
7 | ऑस्टिन | 17 | चेन्नई | 27 | लॉन एंजेलस |
8 | हनॉई | 18 | पॅरिस | 28 | दुबलिन |
9 | बोस्टन | 19 | मनिला | 29 | नानजिंग |
10 | नैरोबी | 20 | सीटले | 30 | स्टॉकहोम |
Asia Pacific | Americas | EMEA |
- गतीशील शहरांची यादी तयार करताना एकूण ४२ परिमाणांचा विचार करण्यात आला आहे.
- ही यादी तयार करताना आर्थिक उत्पादकता, लोकसंख्या, हवाई संपर्क, कॉर्पोरेट मुख्यालये, थेट विदेशी गुंतवणूक आदी बाबींचा प्रामुख्याने विचार करण्यात आला आहे.
- बांधकाम, व्यवहारातील पारदर्शकता, हॉटेल्समधील गुंतवणूक आदी बाबींचाही अभ्यास करण्यात आला. याशिवाय उच्च शिक्षणासाठीच्या पायाभूत सुविधा, कल्पकतेची क्षमता, आंतरराष्ट्रीय पेटंट, तंत्रज्ञानाचा वापर, पर्यावरणाची स्थिती या बाबीही विचारात घेण्यात आल्या.
महत्वाचे निष्कर्ष
- गतीशील शहरांच्या यादीत समाविष्ट झालेली शहरे शक्तीशाली आणि प्रभावशाली आहेत.
- या शहरातील महापौर आणि प्रशासक अनेक भूमिका पार पाडत आहेत.
- तंत्रज्ञानाच्या शहराच्या गतीवर मोठा परिणाम होत आहे.
- ही शहरे पर्यावरणाच्या समस्येवर मात करण्यासाठी पुढाकार घेत आहेत.