Quick Links

OVERVIEW & FUNCTIONING

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक पुण्याने राष्ट्रकुट, सातवाहन आणि यादवी राजवट अनुभवली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी तरुणवयात राजमाता जिजाबाईंसोबत मिळून शहराच्या स्थापनेचा पाया विकसित केला होता. पुण्याच्या विकासात पेशव्यांचेही मोलाचे योगदान होते.  इ.स. 1818 मध्ये पेशव्यांचे साम्राज्य लोप पावल्यानंतर ब्रिटीशांनी पुणे आणि त्याच्या भोवतालचा परिसर आपल्या ताब्यात घेतला. इ.स. 1858 साली नगर परिषदेच्या स्थापनेनंतर शहरात नागरी पायाभूत सुविधा उभारल्या गेल्या.

मोठा ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभलेल्या पुणे शहरात 1950 साली महानगरपालिकेची स्थापना झाली. त्यानंतरच्या काळात, विशेषतः 1962 साली पानशेतच्या पुरानंतर शहराचा अधिक वेगाने विकास होत गेला. पुणे महानगरपालिका नागरिकांना पाणी, रस्ते, वीज, प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणाच्या सुविधा पुरविण्याबरोबरच शहराचा ऐतिहासिक वारसा जतन करण्यासाठी  प्रयत्नशील आहे.  वारसा जतन करुन शहरातील पर्यटनाचा विकास करण्यासाठी वारसा व्यवस्थापन विभागाची स्थापना करण्यात आली आहे. विभागाने काही महत्त्वपुर्ण प्रकल्प हाती घेतले असून शहरातील सर्व वारसा स्थळांची यादी तयार करण्यासाठी विशेष समिती नेमण्यात आली आहे. 

DEPARTMENT INFORMATION

खाते प्रमुख

खाते प्रमुखाचे नाव: श्री.शिवाजी लंके

पदनाम: अधिक्षक अभियंता

ई-मेल आयडी: shivaji.lanke@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931270

आईटी नोडल ऑफिसर

नोडल ऑफिसरच नाव: श्रीमती. हर्षदा शिंदे

पदनाम: कार्यकारी अभियंता

ई-मेल आयडी: harshada.shinde@punecorporation.org

मोबाइल क्रमांक: +91 9689931328

विभागाची माहिती

विभाग पत्ता: भवन रचना कार्यालय, पुणे महानगरपालिका

दूरध्वनी क्रमांक: +91 20 25501355

ई-मेल आयडी:

image